Monday, December 29, 2014

जिक्र तेरा जमानेसे जब जब मै करता हूँ
जीतली ये जिंदगी कहकर जीतना भुल जाता हूँ।

हसरत तुझे हसानेकी दील मे जब मै रखता हूँ
हसता तुझे देखता हु और हसना भुल जाता हूँ।

तुझे मै जानता हु, ये खुदसे जब मै कहता हूँ
सच कहता हु जान, मै जीना भुल जाता हूँ।

जब जब तुम सजती हो सोच मे पड जाता हूँ
सवरता तुम्हे देखकर साँस लेना भुल जाता हूँ।

खुदा से तुझे मांगनेकी ख्वाहीश जब मै करता हूँ
तुझे खोनेके खौफ से, खुद को भुल जाता हूँ।

जीवनाचे नाटक

पृथ्वीच्या या रंगमंचावर
जीवनाचे नाटक चालते
सृष्टी ची असते लायटींग
नशिबाचे पोस्टर चढते

येथे मिळतो विनामूल्य प्रवेश
वशिल्यासाठी तडजोड नसते
ठराविक काळाचा असतो प्रयोग
ब्रेक घेण्याची गरजच नसते

जीवनाच्या या नाटकामध्ये
प्रत्येक जण  काम करत असतो
कधी प्रसंगी गंभीर होतो तर,
कधी आनंदाने हसतो

भगवंत असतो दिग्दर्शक येथील
निवड त्याचा  हातात असते
त्यांनी ठरवलेले प्रयोग च चालतात
माणसाच्या आवडीचे महत्त्व नसते

असे हे पृथ्वीच्या रंगमंचावर जीवनाचे नाटक चालते
सृष्टी ची असते लायटींग नशिबाचे पोस्टर चढते .

Modern

jeans घातली spyker ची
आणि T-shirt सुद्धा branded
गॉगल  घातला fasttrack चा
सगळयाच गोष्टी आहेत mandate  ।।

काटकसरीची काय मजाल ?
आपल्या सुखात घुटमळण्याची
इथं सोन्याचा धुर निघतो
गरज काय  शीळ खाण्याची     ।।

कुणी कितीही तडफडो
आम्ही आमच्या धुंदीत जगणार
कुणी कानउघाडणी केली तर
lecture देतो म्हणणार          ।।

गरज आहे आता
डोळे उघडुन बघण्याची
हातावर पोट घेऊन फिरणाऱ्यांच्या
डोळ्यांतील भूक भागवण्याची      ।।

modern होऊ नये आपण
फक्त रंग, रुप, वेशाने
आसरा द्यावा गरजूंना
आपल्या 'modern' विचारांनी     ।।

आई बापाने सोडून दिलं
ज्या इटुकल्या एकट्या पावलांना
कधीतरी साथ द्यावी त्यांना
घेऊन modern विचार संगतीला    ।।

वाढवले मुलांना ज्यांनी
रक्त आटवून स्वतःचे
काठी बनावी त्यांची
द्यावे क्षण आनंदाचे    ।।

कधीतरी ह्या सुखवस्तूं पासून   
दूर जाऊन पाहावे
कधीतरी स्वतः साठी नाही
दुसऱ्यांसाठी जगुन पाहावे    ।।
आयुष्य हे असच असतं
आपल्याला काही हव असतं ते कधीच मिळत नसतं तर ते मिळवायचं  असतं
आयुष्य हे फार सुंदर असतं
ते सुखकर करणं  आपल्याच हातात असतं
आयुष्य हे फार क्षुद्र असतं
आपल्या कर्मातून ते महान करायचं असतं
आयुष्य हे फार खडतर असतं
त्यातून योग्य मार्ग काढणं हे आपल्याच हातात असतं
 आयुष्य हे जगणं सुद्धा हे एक आव्हान असतं
आलेल्या संकटाना धैर्याने सामोरे जायचं असतं.
आयुष्य हे कोऱ्या  कागदा  सारखा असतं
त्यात मनाजोगे रंग भरणं पण आपल्याच हातात असतं

आयुष्यावर बोलण्य़ाइतका  मी मोठा नाही मित्रांनो
पण एवढाच सांगतो कि आपल्या आयुष्यात जे काही घडते
त्याला आपणच जबाबदार असतो .

* पत्नीपणाचं वचन *

भावी आयुष्याची स्वप्ने रंगवुन
जेव्हा ती तुझ्या घरी येते
अनोळखी असतात तिच्यासाठी सगळेच
ती सगळ्यांनाच आपलंस करते

तिच्या येण्याने घराला तुझ्या
पुन्हा नव्याने घरपण येते
सुख दुःख सारं तुझं
ती तुझ्यासोबतच वाटुन घेते

आईची मिळाली तुला ममता
बहिणीची मायाही मिळत असते
घरात ही आल्यावर मग
आईबहिणीची भुमिका तिच वठवते

तुझ्याचसाठी ती गंगा बनते
सीता बनुन अग्निपरिक्षाही देते
तुझ्या प्राण हरणा-या यमालाही
सावित्री बनुन माघारी पाठवते

कारण सात फेरे घेताना
चौथ्या फे-याला पुढे येऊन
ती सौभाग्यवती म्हणुन मरावं
म्हणुन पत्नीपणाचं वचन घेते...!

आजोबांच्या ट्रंकेत

आजोबांच्या ट्रंकेमध्यें
ढब्बू पैसे आहेत चार
बंदा रूपया चांदीचा
जपून ठेवलाय जीवापाड 

ट्रंकेमध्यें आहे त्यांच्या
पोषाख एक खादीचा
त्यातच त्यांनी लपवलाय
फोटो माझ्या आजीचा

छोटी दोन पिस्तुलेही
आहेत त्यात जर्मनची
ग्रामोफोनच्या तबकड्या ज्यात
गाणी एस्.डी. बर्मनची

स्वातंत्र्यलढ्यात आजोबांनी
भोगला होता कारावास
मोठ्मोठ्या नेत्यांशी
दोस्ती त्यांची होती खास

लढ्यात होते त्यांच्यासोबत
मोठे बंधू भाऊ, दाजी
खंबीरपणे त्यांच्यापाठी
राहीली होती तेव्हां आजी

त्यावेळचे खूप फोटो
आहेत त्यांच्या साठवणीत
ट्रंक उघडून बसतात तेव्हां
रंगून जातात आठवणीत

हल्ली तर आजोबा
नेहमीच ट्रंक उघडतात
जवळ कोणी गेलं तर
त्याच्यावरती बिघडतात

खचून गेलेत आजोबा
आजीच्या जाण्याने
फोटो बघत आजीचा
डोळे भरतात पाण्याने

जीवन एक गाणं झालं

माणसं जपायचं कसब
माझ्यात कधीच नव्हत
प्रवाहावर वाहणं माझं
उगाच जगण होतं
मी मित्र मिळवले नाही
मित्रांनी मला मिळवलं
काहींनी टिकवलं
काहींनी सोडून दिलं .
या सुटण्या धरण्याच्या खेळात
वाईट एकाच गोष्टीचं वाटतं
ज्यांना खरच
हृदयापासून जपायचं होतं
त्यांनाच मन दुखवत गेलं
मन असं का असतं
मनाला खरच काय हवं असतं
मला कधीच नाही कळलं
पण  चुकलेल्या सुरांचं
जीवन एक गाणं झालं

Sunday, December 28, 2014

वाढ माय वाढ गं

शिळा भाकर तुकडा
दुर्डीतून काढ  गं !
दारी आले तुझ्या
वाढ माय वाढ  गं ! !

वाइट या गावचे रंक
साऱ्यानी मारले मज डंक !
दिवसभर रडला माझा कान्हा
पाजाया ना फुटे त्यास पान्हा  !
दोन दिसाची मी उपासी
आशेने आले  तुझ्या दारासी !
 बाळाचे रडणे ऐकुन तरी
उघड आता कवाड गं !
दारी आले तुझ्या ; वाढ माय वाढ गं ! !

तू काही दिल्या सिवाय
ना जाणार येथून आज गं !
जरी असेल अंगी फाटकी
ना त्याची मज लाज गं !
बाळासाठी हींडे गावोगावी
त्याचाच मज ध्यास गं !
जरी नसे माझ्या पदरात काही
कोरडेच पुरवी मी त्याचे लाड गं !
दारी आले तुझ्या ; वाढ माय वाढ गं ! !

कळले मज आता
ना देणार मज तु काही !
उभी राहुन दारा
वाट तुझी मी पाही !
तुलाही चिमुरडे दोन
त्याचे पुरवसी लाड !
बघे कासावीस होउन
त्यातलं देते का थोडं !
कळले मज आता
जाते  मी  निघूनं !
नको श्राप देऊ मला
वाईट नजरेने बघूनं !
कुत्र्याला जे टाकते
ते तरी मज टाक गं !
दारी आले तुझ्या ; वाढ माय वाढ गं !
बंडूला एकदा नारदमुनींनी
दर्शन दिले स्वप्नात येऊन
फेरफटका मारण्यासाठी
स्वर्गात त्याला ते गेले घेऊन

ब्रह्मा,विष्णू,महेशाने
त्याचे तिथे स्वागत केले
आपापल्या महालामध्यें
तीघेही त्याला घेऊन गेले

चित्रगुप्ताच्या दरबारात जाऊन
पाहीले त्याने तिथले काम
वैतागलेला चित्रगुप्त
डोक्याला होता लावित बाम

रेड्यावरती बसून यम
तयारी करीत होता जायची
सांगत होता "अपघातातली
शंभर माणसे आहेत यायची"

अमृतकलश चोरण्याचा बेत
पहारेकर्याशने पाडला हाणून
बंडूला नेऊन उभा केला
भर पावसात शिक्षा म्हणून

पावसात बंडू भिजला आणि
गात्रं न् गात्रं त्याची थिजली
खरं म्हणजे तेव्हां त्याची
गादीच होती चिंब भिजली
"ओळखलंत कां डॉक्टर मला?" पेशंट आला कुणी
कपडे होते भिजलेले त्यात गटाराचं पाणी.
तोंड आपलं वाकडं करून आधी जरा हसला
कसाबसा तोल सावरत खुर्चीमध्ये बसला.
डुलतडुलत बोलला मग खाली थोडं वाकून
"अड्ड्यावरती जाऊन आलोय आत्ताच थोडी टाकून.
कशी हल्ली दारू पाडतात कळत नाही काही ,
पहिल्या धारेची घेऊन सुद्धा मुळीच चढत नाही.
नकली दारू पितोय आणि त्यातच शोधतोय नशा
लिव्हर झाली खराब आणि शरीराची होतेय दशा.
'दारू सोड' म्हटलंत म्हणूनच पोटात तिला सोडली
बायको गेली पळून आणि हिच्याशी मैत्री जोडली.
पोटात होतेय जळजळ जरा काळजी माझी घ्या
रॅनटॅकबरोबर दोन चमचे जेल्युसील तरी द्या.
अड्ड्यावरती राडा करून मार थोडा खाल्लाय
मला वाटतं वरचा एक दात जरासा हाल्लाय.
पोटावरती कुणीतरी फिरवून गेलाय चाकू
बिनधास्त घाला टाके तुम्ही करू नका का कू"
रागावलेला मला बघून बरळतंच तो उठला
"अड्ड्यावरती डॉक्टर आज तुम्ही नाही भेटला?"
खळखळून हसले सगळे पेशंट खजील मी झालोय
काय करू मी सांगा सर, तुमच्याकडे सल्ल्यासाठी आलोय
सर तुम्ही काही सांगा तुमचा सल्ला मी मानीन
'अड्ड्यावर जाणं सोड' म्ह्टलंत, तर मात्र कानफटात हाणीन
दु:खाचे वादळ थोपवन्याची
             आहे तुझ्यात रे ती हिम्मत
म्हनून का रे या जीवनाला
              समजू नको तू गम्मत

ठेच लागली म्हनूनी वेड्या
             तू चालायच रे थांबू नको
फुलांना जरि नाही तुडविले
              तरी काटे वेचणे विसरु नको

वाटेवरुन या जाताना तुला
            सा‍‍क्ष देईल हरएक सुमनपाकळी
आपल्या मैत्रीची अशीच राहील
            उदंड निस्वार्थ अतूट साखळी

तुझ्या संगती मी असेन जेव्हा
             नसेल माझ्या मनी स्वार्थ
कधी कुणा का कळला आहे
             मैत्रीचा या गूढ मतितार्थ

विरहाचा दाह होऊ न देण्यास
             भेटीस तुझ्या येईन मी पण
निमित्ताने मात्र भेटीच्या
              जागतील जुन्या आठवणीपण


स्पर्श प्रेमाचा झाला जरि मज
           तूला न भूलण्याची देतो मी खात्री
कारण यालाच म्हणतात मित्रा
           जिवलग मित्रांची घनिष्ठ मैत्री.............