Saturday, January 26, 2013

आली होती स्वप्नात एक परी...
एक नवीन जग दाखऊन गेली ...
लावुनी आस भेटण्याची मनाला,
स्वप्न नुसताच दाखवून गेली ...

आसक्तिपरी मन मझ,
गुन्तल तिच्या प्रेमात,
न रहवुनी विचारले असता,
नकार मात्र कळवून गेली ....

तुटला सगळ मन,
राहिले फ़क्त शब्द,
सुंदरशी छाप मात्र,
मनावर माझ्या उमटवून गेली ...

दिसणे सुन्दर, लाजने हळूच,
होकर द्यावा तिच्याही मनात आहे,
नकळत का होइना,
मनाला मन मात्र जोडून गेली ....

खुप वेळ वाट पहिली,
चेहरा तिचा उतरला,
हळूच हसून होकार तिने कळवला,
सूर्य किरण डोळ्यावर येता,
झोप सगळी निघून गेली,
स्वप्नात होकार देऊन मात्र,
प्रेमाच स्वप्न अधुरच सोडून गेली ....

No comments:

Post a Comment