ते आज अचानक रस्त्याने जातांना दिसले
वयापेक्षा थोडे जास्त थकलेले भासले
मी धावत जाऊन त्यांना तेथेच थांबवले
त्यांच्या उपकाराने मला पाठीत वाकवले
नमस्कारासाठीचे हात त्यांनी मध्येच थांबवले
मला उभे करुन आपल्या गळ्याशी लावले
"किती मोठा झालास तु?" त्यांचे डोळे पाणावले
तो प्रेमळ स्वर ऎकुन माझॆही बांध सारे फुटले
गर्वाने रुंद त्यांच्या छातीत मी स्वताला सोपवले
"काय करतोस आता "गुरुजींनी मला विचारले
माझी प्रगती ऎकुन ते खुपच सुखावले
"शाळेत किती रे मार खायचास?"ते गमतीने म्हणाले
मला पुढे शिकवण्या सर्वांशी ते किती होते भांड्ले
त्यांनी दिलेली पुस्तकं मी आजही आहेत साठवले
"घरी चला "म्हणताच ऎकदम गोड हसले
डोक्यावर हात ठेवुन,पुन्हा येईन म्हणाले
माझ्या सारख्याच कुणासाठी तरी ते लगबग निघाले
जातांना त्यांचा फाट्का शर्ट आणी झिजलेल्या चपला एवढेच मला दिसले.............

No comments:
Post a Comment