एक दोरी असावी आपुल्या हाती
जी धरुन ठेवेल काळाची गती
मग होईल मनासारखं सारं
उघडतील सारी भाग्याची दारं
मनासारखं मग जगता येईल
मनमुराद मग हसता येईल
कधी धावता, कधी अडखळता येईल
कधी मनमोकळे रडता येईल
कधी सुखांसाठी मन धावेल
कधी नवसावाचुन देव पावेल
सारे काही हाती असेल
मग उगाच कशाला भिती असेल
बालपणीचे खेळ ना संपतील
जवानीच्या रंगातही रंगतील
इंद्रधनु जे रंग बरसतील
आकाशातुन मनी उतरतील
आयुष्याची सांज जेव्हा सरेल
मस्त आठवणींच्या धुंदित झुरेल
सारेच फासे आपले पडतील
मरणाचेही सोहळॆ घडतील
जी धरुन ठेवेल काळाची गती
मग होईल मनासारखं सारं
उघडतील सारी भाग्याची दारं
मनासारखं मग जगता येईल
मनमुराद मग हसता येईल
कधी धावता, कधी अडखळता येईल
कधी मनमोकळे रडता येईल
कधी सुखांसाठी मन धावेल
कधी नवसावाचुन देव पावेल
सारे काही हाती असेल
मग उगाच कशाला भिती असेल
बालपणीचे खेळ ना संपतील
जवानीच्या रंगातही रंगतील
इंद्रधनु जे रंग बरसतील
आकाशातुन मनी उतरतील
आयुष्याची सांज जेव्हा सरेल
मस्त आठवणींच्या धुंदित झुरेल
सारेच फासे आपले पडतील
मरणाचेही सोहळॆ घडतील