Friday, June 1, 2012

नाते दोन जिवांचे !
नाते दोन जीवांचे, तुझे नि माझे
दूर- लांब राहूनही अतूट राहते कसे? ।।धृ।।
कधी आनंदाने गळ्यात सुचतात गाणी
कधी तुझी आठवण, डोळ्यांत आणते पाणी
गाण्यातील सूर मग असे फुटतात कसे?
नाते दोन जीवांचे, तुझे नि माझे
दूर-लांब राहूनही अतूट राहते कसे? ।।1।।
कधी स्वप्नात येऊन, बेचैन करून जातेस
कधी योगाने भेटल्यावर वायदा देऊनफसवतेस
भेटीतील ओढ मग वाढतच कशी जाते?
नाते दोन जीवांचे, तुझे नि माझे
दूर - लांब राहूनही अतूट राहते कसे? ।।2।।
कधी हसतेस, कधी रुसतेस, तर कधी रागावतेस
कधी गुपचुप रडतेस, तर कधी मलाही रडवतेस
नयनांतून आसू मग वाहतात कसे?
नाते दोन जीवांचे, तुझे नि माझे
दूर-लांब राहूनही अतूट राहते कसे? ।।3।।
नाते आपले अतूट - अखंड राहू दे
आपल्यातील प्रेम असेच उदंड वाढू दे
दूध-साखरेसारखे आपले नाते मग घट्ट बनेल असे
नाते दोन जीवांचे, तुझे नि माझे
दूर-लांब राहूनही अतूट राहते कसे... ।।4।।

No comments:

Post a Comment