Friday, June 29, 2012

हर एक क्षणाला नाही पण ....
....कोणी तरी तुझा विचार करतं

दिसुन येत नाही कधी पण ...
...कोणी तरी तुझी काळजी करतं

जाणवत नसेल कधी तुला पण...
...कोणी तरी तु नसल्याची खंत करतं

उगाचं नाही श्यक्य होत कधी पण ...
... कोणी तरी तुझ्याशी बोलायची संधी शोधतं

कळतही नाही कधी तुला ...
... कोनाला तरी तुझा अभिमान वाटतो ...

बोलून नसेल सांगत कधी पण ...
... कोणी तरी तुझ्या बद्दल नेहमी शुभ चिंततं...

तुला नसेल कुणावर कधी पण ...
... कोणी तरी तुझ्यावर फार विश्वास करतं ..

ऐकले नसतील सुर कधी तु पण ...
... कोणी तरी तुझ्यासाठी आनंदाचं गाणं गातं

समजूही देत नाही तुला कधी पण ...
... कोणी तरी तुझ्यावर झेपावणारी सारी संकटे स्वतःवर झेलतं

बोलायचं म्हणून नाही पण ...
... " तुझ्यासाठी मी नेहमी इथेचं आहे " सांगावसं वाटतं

सामोरेचं रहा सदा असे नाही पण ...
... कुनाला तरी तुला एकवार मन भरुन पहावसं वाटतं

तुला कोण आवडावं तु ठरवावं पण ..
... तु तु आहे म्हणून कुणाला तरी आवडतं...

तु नेहमी सुखात असावं ...
... आणि तुला कुणी तरी नेहमी आनंदी पाहून आनंदी व्हावं ...

कुणी तरी तुझ्यासाठी कुणीचं नसावं पण...
... कुणा तरी साठी तु बरंचं काही असावं ...

Wednesday, June 27, 2012


तुझे वेड लाउनी गेले ते क्षण
मनाला भुलवून गेले ते क्षण ,
स्वतःला फसवून , जगाला चुकवून
नकळत कुठे पळून गेले ते क्षण .....
चमकत्या गहिऱ्या डोळ्यांत गहिवरून गेलो मी
निस्वार्थ प्रेमजाळ्यात पूर्णत: अडकून गेलो मी ,
अंतरंगास हळुवार स्पर्शून गेले ते क्षण
तुझे वेड लाउनी गेले ते क्षण .....
अवखळ पाऊस अंग अंग भिजवत होता
खट्याळ वारा मनात प्रेमरंग उधळीत होता ,
हव्याहव्याशा सहवासात जागीच स्तब्ध झाले ते क्षण
तुझे वेड लाउनी गेले ते क्षण ....
तू आली सळसळणार्या वाऱ्यासारखी आयुष्यात
तू बहरली आंब्याच्या मोहरासारखी आयुष्यात ,
हृदयाच्या वेलीवर सहस्त्र पुष्प फुलवून गेले ते क्षण
तुझे वेड लाउनी गेले ते क्षण ....
अचानक उमटली तुझी पाऊले एकदा दारी
कानाकोपऱ्यात नांदली जशी लक्ष्मी माझ्या घरी ,
पाऊलखुणा हृदयात साठवून गेले ते क्षण
तुझे वेड लाउनी गेले ते क्षण .....
तुझे वेड लाउनी गेले ते क्षण
जीवनवाट तुझसंगे चालुनी गेले ते क्षण ,
तुझी साथ देईन , फक्त तुझाच बनून राहीन
जन्मभर हे वचन निभवून गेले ते क्षण .....

मृगेश

Sunday, June 24, 2012


Mrugesh PisalBlogger Widgets

Thursday, June 21, 2012


माझ्यापेक्षा तुझ्यात रमून जानेमला पसंद आहे
तुझ्या डोळ्यात रमून जाण्यात एक वेगळाच आनंद आहे.
तुला हसवण्यापेक्षा तुला रडवणे मला पसंद आहे
मिट्टीत घेवून तुला समजावण्यात एक वेगळाच आनंद आहे.
तुझ्या होकाराला नकार देणे मला पसंद आहे
तुला रागवलेली पाहण्यात एक वेगळाच आनंद आहे.
माझ्यापेक्षा तुला सुखी ठेवणे मला पसंद आहे
तुझ्या सुखात आपले सुख समजण्यात एक वेगळाच आनंद आहे.
तुझ्यापेक्षा माझ्या डोळ्यातून अश्रू वाहणेमला पसंद आहे
वाहणारे अश्रू थांबवण्यात एक वेगळाच आनंद आहे....


आता फुलांनी थोडं
जपायाला हव,
चोरटया नजरांपासून
लपायला हव...
.
पाकळ्यानींही स्वत:ला
सावरायला हव,
उगाचच दूरवर पसरण
आवरायला हव...
.
इथे छंद म्हणुन
फुलं हुंगणारे बरेच,
अन धुंदवेडे होवून
फुलं चुंबणारेही तेवढेच...
.
कुणी सांगाव हे फुलांना
त्यांनीच सारे समजायला हव,
कुणाच्या कुशीत शिराव अलगद
हे फुलांनीच ठरवायला हव ....
त्यांच त्यांनीच ठरवायला हव........
.

बोल बाबा  बोल,
काहीतरी बोल,
माझ्यासाठी तरी,
आज ओठ तुझे खोल ,

बोलून बोलून थकले रे ,
आता माझे तोंड,
का रे अचानक आज
मांडले तू बंड,

लावू नको माझा,
उगा जीव टांगणीला,
क्षमा कर न रे राजा,
तुझ्या या राणीला,

कळत कस नाही तुला,
खोट खोट रुसणं,
बर का हे अस ,
वेळोवेळी हिरमुसणं,

छळू नको माझ्या राजा,
पकडले मी कान,
माफ केल म्हणून नुसती,
हलव तरी मान.

आता मात्र हद्द झाली,
हास पाहू आधी,
निघून जाईन नाहीतर मी,
बोलणार नाही कधी,

आता कशी स्वारी ,
छान वळणावर आली,
उशिरा का होईना,
पण दया तुला आली,

तुझ्याशिवाय दुसर कोणी,
आहे का रे मला,
चुकले तरी तूच आता
सांभाळून घे मला,

उशीर झाला निघते आता,
कशी थांबू या अवेळी,
रागवू नकोस पुन्हा ,
उद्या भेटू या सकाळी...........

Tuesday, June 19, 2012

तुझ्या माझ्या प्रेमाचं प्रिये,
गणित थोडं वेगळ असावं..
गंध होऊन वाऱ्याचा,
तू श्वासांत माझ्या मिसळावं
अन् सहवासात तुझ्या प्रिये,
मि श्वास घ्यायलाच विसरावं..
तुझ्या माझ्या प्रेमाचं प्रिये,
गणित थोडं वेगळ असावं..
पाहताना डोळ्यात तुझ्या,
मि मलाच शोधावं
अन् बोलायचं असलं खूप तरी,
डोळ्यांनीच
मि तुझ्याशी बोलावं..
तुझ्या माझ्या प्रेमाचं प्रिये,
गणित थोडं वेगळ असावं..
भरभरून करतांना प्रेम,
कधी माझ्यावर तू रुसाव
अन् मि घेतल्यावर मिठीत,
खूप गोड तू हसावं..
तुझ्या माझ्या प्रेमाचं प्रिये,
गणित थोडं वेगळ असावं..
मिठीत तुझ्या असतांना,
वेळेनही थोडं थांबावं..
अन् शक्य नसल या आयुष्यात तरी,
जन्मात पुढच्या हेच घडाव..
तुझ्या माझ्या प्रेमाचं प्रिये,
गणितच थोडं वेगळ असावं.
एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याला आपल्या मनातले सर्व काही सांगावे,
सांगता सांगता आयुष्य पूर्ण सरुन जावे,
आणि सर्तानाही आयुष्य पुन्हा पुन्हा जगावे........

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याला घेऊन सोबतीने खूप खूप चालावे,
चालता चालता दूरवर खूप खूप थकावे,
पण थकल्यावरही आधारसाठी त्याच्याकडेच पहावे........

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
दुख त्याचे आणि अश्रू माझे असावेत,
सोबतीने त्याच्या खूप खूप रडावे,
आणि अश्रूंच्या हुंदक्यात सर्व दुख विरून जावे.........

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
आनंद त्याचा आणि हसू माझे असावे,
त्याच्यासाठी मी जगतच राहावे, जगतच राहावे,
आणि त्याच्यासाठी जगतानाच आयुष्य संपून जावे.......

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याच्या सोबतितल्या प्रत्येक क्षणाने सुखवावे,
उन्हात त्याने सावली तर पावसात थेंब व्हावे,
आणि मायेच्या थेंबानी मी चिंब भिजून जावे...........

आयुष्यातली एकच इच्छा......
राजा-राणीच्या संसारातील राजाच ते
पण माझ्यासाठी फक्त माझे बाबाच आहे ते

छोटुशी बाहुली पाहून झाले होते खूप आनंदी
मलाच सर्वस्व मानून उडू लागले होते स्वच्छंदी

बाबा बाबा म्हणत माग फीरण काम होत माझ
माझे लाड पुरवणे हेच स्वप्न होत त्याचं

हातांचा झुला करून झुलवले आहे त्यांनी मला
माझ्यासाठी एक खेळणे बनवले होते स्वतःला

त्यांची ती मऊ मांडी गादिहून छान मला भासली
माझ्यासाठी तर ती हक्काची जागाच होती बनली

नव्हते लादले कधी त्यांनी ते आपेक्ष्यांचे ओझे
तेच नेहमी माझ्यासाठी होते खूप मोठे

माझ्यासाठी रात्रंदिवस ते झिजले आहेत नेहमी
स्वतःचे सुख ठेऊन पहिले मला पाहीले आहे त्यांनी

दमून भागून आले तरी जवळ घ्यायचे ते मला
आईच्या रागापासून वाचवण हेच काम होत त्यांना

माझ्याशिवाय कधी जेवले नाही ते
मला झोपवूनच मग झोपले नेहमी ते

एकाच नेहमी चिंता जाणवत आसते त्यांना
सासुराला मी गेल्यावर आठवतील का ते मला

कस सांगू आता मी त्यांना............

मातीच्या ह्या गोळ्याला आकार तुम्ही दिला
तुम्हाला विसरणं आता अशक्यच आहे मला

बाबा तुम्ही हे करा बाबा तुम्ही ते करा आसते मी नेहमी म्हणत
मी गेल्यावर तुम्ही एकटे पडू नये हेच आसत त्या मागच कारण

काळजी नका करू तुम्ही ,तुमची बछडी आहे खूप हुशार
जीवनातील आव्हानांना तोंड देण्या घेणार नाही मी माघार

Monday, June 18, 2012

ऑफीस मधे बसल्या बसल्या विचार करत होतो,
हे दिवस चांगले की कॉलेजचे ...

जुगलबंदी चालू होती दोघांची..
आता वेळ कमी तेव्हा पैसे कमी..
आनंदी आता आहे का तेव्हा होतो ?
आठवता आठवता दुखी होतो....

तेव्हा रोड साइड जीन्स वापरायचो...मित्रांच्या
आता CK, Diesel धूळ खात पडल्या आहेत माझ्या...

तेव्हा सामोसा दिसला की भूक शमायची....
आता पिझ्झा बर्गरने सुद्धा ती नाही लागायची..

ऑफीस मधे बसल्या बसल्या विचार करत होतो,....
हे दिवस चांगले की कॉलेजचे ...

तेव्हा पैसे जमवून पेट्रोल भरायचो..
लांब लांब फिरायला जायचो...
आता tank फुल्ल असूनही...
मित्रांना मुकलो....

टपरी वरचा चहा CCD मधल्या cofee मधे बदलला,
पण हा फरक मनाला नाही पटला..

Pre-Paid Card वरुन बोलायची तेव्हा मजा यायची...
आता postpaid असूनही बोलायला नाही कुणी..

ऑफीस मधे बसल्या बसल्या विचार करत होतो,....
हे दिवस चांगले की कॉलेजचे ...

दिवस बदलले ... General class मधून Business Class झाला.
पण फिरायला आता वेळ नाही उरला...

तेव्हा Second hand का होईना Desktop असावा असे .वाटत..
आजकाल Branded Laptop असूनही चालू करावा नाही वाटत...

खरी मैत्री Proffesional frenz मधे बदलली
पण त्या...मैत्रीची सर नाही आली....

ऑफीस मधे बसल्या बसल्या विचार करत होतो,....
हे दिवस चांगले की कॉलेजचे ...

Sunday, June 17, 2012

प्रेमाला प्रेम समजणारी ती प्रेयसी असावी
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी असावी.....बागेतल्या फुलांसारखी सुंदर नसली तरी,
पण अंगणातल्या तुळसेसारखी पवित्र असावी...थोडी खट्टी...थोडी मिठी असावी
तिच्या लटक्या रुसण्या फुगण्यात मज्जा असावी....प्रेमाला प्रेम समजणारी ती प्रेयसी असावी
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी असावी

तेल आणि वात यांसारखी आमची जोडी असावी,......
एकरूप होऊन जळताना इतरांना प्रकाश देणारी असावी

Tuesday, June 5, 2012

तुझ्या मैत्रीवर कितीही लिहीलं
तरी उनं वाटतं
सारं आहे माझ्याकडे आज
तरी कुठंतरी काहीतरी सुनं वाटतं

तुझ्या मैत्रीचे क्षण
पुन्हा हवेहवेसे वाटु लागतात
आज मन माझं लख्ख आकाश
त्यात तुझ्या आठवांचे ढग दाटु लागतात

तुझ्या मैत्रीची गर्द सावली
अशी आयुष्यावर दाटली होती
आयुष्यातली उन्हं माझ्या
तुझ्याचमुळे आटली होती

तुझ्या मैत्रीच्या आठवणी
मी आजही जपुन ठेवतो
आनंदाचे ते क्षण हरवु नयेत म्हणुन
काळजाच्या तिजोरीत लपुन ठेवतो

मैत्रीचं नातं तुझ्या
माझ्याशी आजन्म असचं राहील
तुला ठेच लागली कधी
तर पापणी माझी वाहील

मन माझे वेडे
पुन्हा एकदा त्या क्षणांचा शोध घेतात
अन शब्द माझे कवितेतुन
तुझ्या मैत्रीचा वेध घेतात ....

स्वप्नांच्या जगात माझ्या एक फुलांची बाग होती
बागेतल्या त्या कट्ट्यावर फक्त तुझीच मला साथ होती
हातात घेवून तुझा हाथ तिथे कविता मी करत होतो
तुझ्याच प्रेमात ग सजणी वेड्यासारखा मी झुरत होतो
तू स्वप्नातही मला अचानकच सोडून जायचीस
वेड्या ह्या जीवाला माझ्या, एकाकी सोडायचीस
घाबरलेल मन माझ तुला शोधत फिरायचं
थकून भागून बिचार मग एकटच रडायचं
स्वप्नातही कधी तू माझी न झालीस
एकट्याला टाकून मला दूरदेशी गेलीस
दूरदेशीच्या राजकुमारात तू अस काय ग बघितलंस
तुझ्याच ह्या प्रतिबिंबाला अस का ग रडवलस???
आजही तुझ्या पाऊलखुणा त्या वाटेवर शाबूत आहेत
परतीची वाट कधीच नसते रडून मला सांगत आहेत

Monday, June 4, 2012

दोस्त बनाना सिखा दिया है जिंदगी ने
खुश रेहना सिखा दिया है जिंदगी ने

दूर रेहकर भी पास होते हो तुम
तुमसे बात करना सिखा दिया है जिंदगी ने

रोंना नही आता है मुझे शायद
हंसणा सिखा दिया है जिंदगी ने

फूलो मे खुशबू ही न सही
पर खुशबू को मेहसुस  करना  सिखा दिया है जिंदगी ने


 
थकलेले जीव सारे
सावलीला निजले होते
बाभळीचे झाड घराशी
फुलांनी सजले होते
पाखरांनी आपले घरटे
छपराला टांगले होते
भातुकलीचे डाव दारी
खेळ सारे मांडले होते

तेव्हा उमगले ते घर
माझ्या मित्रांने बाधले होते.

Friday, June 1, 2012

नसतेस घरी तू जेव्हा
जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे
संसार फाटका होतो

नभ फाटून वीज पडावी
कल्लोळ तसा ओढवतो
ही धरा दिशाहीन होते
अन्‌ चंद्र पोरका होतो

येतात उन्हे दाराशी
हिरमुसून जाती मागे
खिडकीशी थबकुन वारा
तव गंधावाचून जातो

तव मिठीत विरघळणाऱ्या
मज स्मरती लाघववेळा
श्वासाविण ह्रुदय अडावे
मी तसाच अकंतिक होतो

तू सांग सखे मज काय
मी सांगू या घरदारा ?
समईचा जीव उदास
माझ्यासह मिणमिण मिटतो

ना अजून झालो मोठा
ना स्वतंत्र अजुनी झालो
तुजवाचून उमगत जाते
तुजवाचून जन्मच अडतो !

गीत - संदीप खरे
नाते दोन जिवांचे !
नाते दोन जीवांचे, तुझे नि माझे
दूर- लांब राहूनही अतूट राहते कसे? ।।धृ।।
कधी आनंदाने गळ्यात सुचतात गाणी
कधी तुझी आठवण, डोळ्यांत आणते पाणी
गाण्यातील सूर मग असे फुटतात कसे?
नाते दोन जीवांचे, तुझे नि माझे
दूर-लांब राहूनही अतूट राहते कसे? ।।1।।
कधी स्वप्नात येऊन, बेचैन करून जातेस
कधी योगाने भेटल्यावर वायदा देऊनफसवतेस
भेटीतील ओढ मग वाढतच कशी जाते?
नाते दोन जीवांचे, तुझे नि माझे
दूर - लांब राहूनही अतूट राहते कसे? ।।2।।
कधी हसतेस, कधी रुसतेस, तर कधी रागावतेस
कधी गुपचुप रडतेस, तर कधी मलाही रडवतेस
नयनांतून आसू मग वाहतात कसे?
नाते दोन जीवांचे, तुझे नि माझे
दूर-लांब राहूनही अतूट राहते कसे? ।।3।।
नाते आपले अतूट - अखंड राहू दे
आपल्यातील प्रेम असेच उदंड वाढू दे
दूध-साखरेसारखे आपले नाते मग घट्ट बनेल असे
नाते दोन जीवांचे, तुझे नि माझे
दूर-लांब राहूनही अतूट राहते कसे... ।।4।।
चिमणा चिमणीचे लगीन,
तिथे वऱ्हाडी कोण कोण ?
चिमणा चिमणीचे लगीन,
तिथे वऱ्हाडी कोण कोण ?

मैना म्हणे मी माळीन,
मैना म्हणे मी माळीन
टोपली भर फुले मी आणीन
टोपली भर फुले मी आणीन. !

चिमणा चिमणीचे लगीन,
तिथे वऱ्हाडी कोण कोण ?

पोपट म्हणे मी भट,
पोपट म्हणे मी भट.
मंत्र म्हणेन मी पाठ
मंत्र म्हणेन मी पाठ.

चिमणा चिमणीचे लगीन,
तिथे वऱ्हाडी कोण कोण ?

कावळा म्हणे मी सोंगाड्या,
कावळा म्हणे मी सोंगाड्या,
लग्नात वाजवेन भोन्गाड्या
लग्नात वाजवेन भोन्गाड्या.

चिमणा चिमणीचे लगीन,
तिथे वऱ्हाडी कोण कोण ?

कोंबडा म्हणे मी आचारी,
कोंबडा म्हणे मी आचारी
पंगत वाढीन दुपारी
पंगत वाढीन दुपारी.

चिमणा चिमणीचे लगीन,
तिथे वऱ्हाडी कोण कोण ?

मोर म्हणे मी नर्तक
मोर म्हणे मी नर्तक.
थुई थुई करून मी नाचेन.
थुई थुई करून मी नाचेन.

चिमणा चिमणीचे लगीन,
तिथे वऱ्हाडी कोण कोण ?

लग्न झाला थाटात
लग्न झाला थाटात
वऱ्हाडी गेले ऐटीत
वऱ्हाडी गेले ऐटीत

चिमणा चिमणीचे लगीन,
तिथे वऱ्हाडी कोण कोण ?