Friday, October 12, 2012


स्वप्नाची परी आपली
हुकुमाची राणी होते
जीभेची छडी तिच्या
तोंडाची तोफ होते
दळायचा डबा हातात
भाजीची पिशवी येते
शहाणे गुलामी स्वीकारतात
त्यालाच प्रेम नाव देतात
शिळ्या भाताबरोबरच
आपला मान गिळून टाकतात
ज्यांना हे कळत नाही
तेच भांडत बसतात
त्यांचा संसार नासून जातो
एक करार फक्त उरतो
सुख सुख म्हणजे
अखेर काय असते
घरचे जेवण दोन वेळ
पोटभरून खाणे असते
कटकटी शिवाय संध्याकाळी
मस्त चहा पिणे असते
तू चालत रहा येतील अडथळे, येतील बाधा मिळतील जुन्या रुढींच्या लाथा साथ मग मिळेल एक एक करुनी तू प्रत्येकाला भेटत रहा तू चालत रहा !!४!! रस्त्यात तुझ्या लोक हसतील पाहून तुला अन चिडवतील तू न पाहता कोनाहीकडे फक्त नजर वाटेवर ठेवून रहा तू चालत रहा !!४!! घरच्यांचीही साथ न लाभेल मित्रही काही तुटक बोलेल तू ऐकत सारे त्यांच्या जवळच रहा तू चालत रहा !!४!! आयुष्य विना ध्येयाचं म्हणजे तीर विना निशान्याच तू नुसताच न बोलता कार्य पुर्णतेला लागून रहा तू चालत रहा !!४!! एक दिवस येईल तुझा लोक समजेन तुला राजा म्हणतील नशिबाने मिळाले सारं पण तू फक्त पाहत रहा तू चालत रहा !!४!!

तू चालत रहा

येतील अडथळे, येतील बाधा
मिळतील जुन्या रुढींच्या लाथा

साथ मग मिळेल एक एक करुनी
तू प्रत्येकाला भेटत रहा

तू चालत रहा !!४!!

रस्त्यात तुझ्या लोक हसतील
पाहून तुला अन चिडवतील

तू न पाहता कोनाहीकडे
फक्त नजर वाटेवर ठेवून रहा

तू चालत रहा !!४!!

घरच्यांचीही साथ न लाभेल
मित्रही काही तुटक बोलेल

तू ऐकत सारे
त्यांच्या जवळच रहा

तू चालत रहा !!४!!

आयुष्य विना ध्येयाचं
म्हणजे तीर विना निशान्याच

तू नुसताच न बोलता
कार्य पुर्णतेला लागून रहा

तू चालत रहा !!४!!

एक दिवस येईल तुझा
लोक समजेन तुला राजा

म्हणतील नशिबाने मिळाले सारं 
पण तू फक्त पाहत रहा   

तू चालत रहा !!४!!

तू चालत रहा

येतील अडथळे, येतील बाधा
मिळतील जुन्या रुढींच्या लाथा

साथ मग मिळेल एक एक करुनी
तू प्रत्येकाला भेटत रहा

तू चालत रहा !!४!!

रस्त्यात तुझ्या लोक हसतील
पाहून तुला अन चिडवतील

तू न पाहता कोनाहीकडे
फक्त नजर वाटेवर ठेवून रहा

तू चालत रहा !!४!!

घरच्यांचीही साथ न लाभेल
मित्रही काही तुटक बोलेल

तू ऐकत सारे
त्यांच्या जवळच रहा

तू चालत रहा !!४!!

आयुष्य विना ध्येयाचं
म्हणजे तीर विना निशान्याच

तू नुसताच न बोलता
कार्य पुर्णतेला लागून रहा

तू चालत रहा !!४!!

एक दिवस येईल तुझा
लोक समजेन तुला राजा

म्हणतील नशिबाने मिळाले सारं 
पण तू फक्त पाहत रहा   

तू चालत रहा !!४!!

Monday, August 13, 2012

आयुष्य

कधी कधी खुप आनन्द देतं
न मागताही सुख देतं,
पण अच्यानक हासता हासता रडवतं
आयुष्य...हे असंच असतं.????

आपण बरंच काही ठरवतो
आयुष्याचे आराखडे बांधतो
पण एका वळणांवर सगळ काही थांबतं
आयुष्य...हे असंच असतं.????

भुतकाळातल्या गोड आठवणी
वेड मन आठवत रहातं
पण त्या मनाला फ़सवुन रडवतं
आयुष्य...हे असंच असतं.????

सुखाबरोंबरच दु:खहीं देतं
कधीही भरुन न येणां-या
भळभळणां-या जखमाहीं देतं
आयुष्य...हे असंच असतं.????

आयुष्यात खुप काही मिळतं
त्यातल बरंच काही नको असतं
पण जे हवं असतं तेच मिळत नसतं
आयुष्य...हे असंच असतं.????

कधी कधी खुप आनन्द देतं
न मागताही सुख देतं,
पण अच्यानक हासता हासता रडवतं
आयुष्य...हे असंच असतं.????

आपण बरंच काही ठरवतो
आयुष्याचे आराखडे बांधतो
पण एका वळणांवर सगळ काही थांबतं
आयुष्य...हे असंच असतं.????

भुतकाळातल्या गोड आठवणी
वेड मन आठवत रहातं
पण त्या मनाला फ़सवुन रडवतं
आयुष्य...हे असंच असतं.????

सुखाबरोंबरच दु:खहीं देतं
कधीही भरुन न येणां-या
भळभळणां-या जखमाहीं देतं
आयुष्य...हे असंच असतं.????

आयुष्यात खुप काही मिळतं
त्यातल बरंच काही नको असतं
पण जे हवं असतं तेच मिळत नसतं
आयुष्य...हे असंच असतं.????
चेहेऱ्याचे रंग रूप...
असो कितीही छान,
मनाची सुंदरताच...
शेवटी करते महान.

कलुषित, ग्रासलेल मन...
न देई कसलीच सुंदरता,
फासून लाख प्रसाधने...
न येईल ती उदारता.

पवित्र,शुद्ध विचारी मन...
करील आनंदी चारही दिशा,
नातलग,मित्रपरिवारात...
नांदेल सुख-समाधानाचा वसा.

ईश्वर मनी तेच असते...
जे तुम्ही चिंतिता,
स्वच्छ मनी वाहुद्या...
सदा सुविचारांचा झरा
माझ्या जिवणाला कुणी आता ओळखावे
माझ्या हसण्याला कुणीतरी समजावे
माझ्या जिवणाचे कुणीतरी गीत गावे
माझ्या आयुष्याला आता वेगळाच रंग यावा
माझ्या भावनांचा अर्थ कुणी समजावा
माझ्या अश्रुनांही आता मोल यावे
आयुष्यात माझ्या आता काही तरी व्हावे
जगही लाजेल असे आता घडावे
माझे जिवणगाणे मीच आता आळवावे
प्रेमाची आशा न करता मीच प्रेम व्हावे
मैत्रीतही मीच आता केंद्रबिंदु व्हावे
मी काय व्हावे ? मी कोण व्हावे ?
मीच माझे स्वप्न व्हावे...
मीच माझे स्वप्न व्हावे.

Saturday, July 21, 2012


अशांत मन माझ ,
तुझ्याच विचारांच्या अधीन आहे ,
कसही असल तरी
जगन फक्त माझ तुझ्याच अधीन आहे
हाताचे बळ जवळ असताना
निराश कधी व्ह्यायचे नसते
गत दुखां ची उजळणी करत
हताश कधी रहायचे नसते ||

यश पदरात पडत नाही
म्हणून कधी रडायचे नसते
नव्या जोमाने सुरुवात करून
जीवनाची दशा बदलायची असते||

हाताचा पसारा दुसर्‍यासमोर धरून
लाचारी कधी स्विकारायची नसते
संकटाची तमा न बाळगता
कष्टाने त्यावर मात करायची असते||

दिवसभर नुसते बसून
अपली रडकथा कधी गायची नसते
आत्मविश्वासणे काम करून
दिवसाची वाटचाल करायची असते||

उद्याचे जीवन आनंदात जाण्यासाठी
आजच आघात सोसायचे असतात
अंनुभावातून आलेला शाहनपणातूनच
जीवनाचे रंग फुलवायचे असतात

एक परी आहे ओळखिची
आपल्याच चौकटीत राहणारी
पंख असून देखिल जमिनीवर चालणारी !
एक परी आहे ओळखिची
प्रेमाची भीती बालगुन

... आपला मन मारत आयुष्य जगणारी एक परी आहे ओळखिची
तिला वाटत प्रेम आहे बकवास
प्रेम म्हणजे आयुष्य खल्लास
पण कोण सांगेल तिला
प्रेम म्हणजे एक हवाहवासा सहवास
एक परी आहे ओळखिची पलते आहे प्रेमा पासून लांब
पण तिला हे कळत नाही आहे
प्रेम हे तिच्या स्वत: मध्येच दडले आहे
कधी कोणी पलु शकतो का स्वत:पासून?
एक परी आहे ओळखिची
खुप आवडते मला ती का समजत नाही तिला
प्रेम म्हणजे काय आहे...........!!!!
तू मिठीत येताच...
तो क्षण तिथेच थांबला..
सरु नये तो काळ..
म्हणून तो देखिल लांबला...
पाने आयुष्याची थोडी चाळून पाहिली
चाळताना जीवाची झाली होती काहिली
पूर्ण आयुष्याची आठवण मी क्षण क्षण जपली
तरी पण ह्या माझ्या छोट्या विश्वात फक्त तुझीच कमी राहिली

आठवणी सांभाळणं खूप सोपं असतं ...,
कारण त्या मनात जपून ठेवता येतात ...
पण " क्षण " सांभाळणं खूप कठीण असतं ...,
कारण क्षणात त्याच्या आठवणी होतात ...

Friday, July 20, 2012

मृगेश

झुळूक लाजरी येते अन स्वप्न वेलीवर झुलते...
सांज सावळी येते अन उगीच धडपड होते ....
देना चाहूल सजणी आज भाव मनी हा दाटे.....
येशील का तू सांग एकदा तुझविन जगणे अधुरे वाटे...
मैत्री
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी,
मैत्रीच्या खुणा आठवणीत बांधणारी..
मनांच्या भिंतींना मैत्रीचे दार पाडून,
एक प्रेमळ मित्रासाठी आर्त हाक देणारी...
कधी शिकवण कधी आठवण,
तहानलेल्या चातकाला जशी पावसाची वणवण...
आपल्या मैत्रीचे दिवस पंखाखाली घेत,
प्रेमाचे मृगजळ शोधतेयं माझे हे जीवन..
तरीही या जीवनात सुखाचा आसमंत फुलवनारी,
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी.........
माझ्या या आयुष्यात तुझ्या मैत्रीचा सहारा,
मैत्रीच्या नात्याला तुझ्या आठवणींचा दुजोरा..
दुःखाच्या चिंब पावसात शोधतोय,
सुखाची उब देणारा तुझ्या मैत्रीचा निवारा...
सकाळच्या सुर्यासोबत इंद्रधनू घेऊन येणारी....
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी.....
कोऱ्य़ा माझ्या आयुष्यात मैत्रीचे चित्र तू चितारले,
प्रेमाच्या सप्तरंगात ते चित्रही नाहून निघाले...
पाणावलेल्या डोळ्यांनी आज पुन्हा त्याकडे बघतोय,
तुझ्या आठवणीचा एक रंग त्यात शोधतोय..
जीवनाच्या चित्रपटलावर वेगळेचं रंग रंगवणारी....
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी...

Tuesday, July 17, 2012


मिटलेली मैत्री
मिटलेलीच असू द्यावी
उमलली कधी तर
अलगद उमलू द्यावी

मिटलेपणात ही
ती मैत्रिच असते
सुखद स्मृतीचे
पराग हुंगित असते

उचकटून तिला
उगा मरू नको
जपला गंध कोष
उगा जाळू नको

मागुन कुणालाच
कधी मैत्री मिळत नाही
वठलेल्या फांदीवर
फुल कधीच उमलत नाही

ज्याला लोक
जमवलेली मैत्री म्हणतात
त्यांच्या डोक्यात फ़क्त
फायद्याचे हिशोब असतात

Friday, July 13, 2012

सुखापेक्षा मला दु:खचं आवडतं,

कारण ?????

तेव्हा तुझा आधार मला असतो..

हसण्यापेक्षा मला रडणचं आवडतं,

कारण ?????

त्यात तुझी आठवण सोबत असते..

सत्यापेक्षा मला स्वप्नचं आवडतात,

कारण ?????

त्यात तुझा निवारा असतो..

प्रेमापेक्षा मला तुझा रागचं आवडतो,

कारण ?????

त्यात तुझ्या मनाच्या भावना असतात..

भेटीपेक्षा मला तुझा विरह आवडतो,

कारण ?????

त्यात तुझ्या ख-या प्रेमाची जाणीव
असते..

Thursday, July 12, 2012

हल्लीच्या या दीवसात
एक मुलगी मला आवडली.....

हल्लीच्या या दीवसात
एक मुलगी मला आवडली.....
काय सांगू
मीत्रांनो इतकी आवडली की,

जणू गुलाबाच्या देठावर
काट्याच असण कींवा,
वीजेचा कडकडाट
आणी प्रकाशाचं दीसण ....

मग ठरवलं
माझ्या मनातील
कलावंताने, तीच्यातील
कलावंताला भेटायचं .
दोनी कलावंताचं
अगदी पोट भरून कौतुक
करायचं

इतक्यात मनात एक
शंखेखोर वीचार आला !
काय ती तयार होईल
यायला ???

यातच दीवसामागून
दीवस जात होते ,
आता तर
बोलणेही मुश्कीलीने होत
होते

असं वाटत होत
की ती वीसरली आपल्याला ...
पण हे
त्या वीधात्याला मान्य
नव्हत, आणी
तीच माझ्या आयुष्यात
पुन्हा येण सहाजीकच
होत.....

पसंद ना पसंद ,
आवडी नीवड़ी पुन्हा जुळू
लागल्या ,
तीच्या मनातील
भावना शब्दांमध्ये व्यक्त
होवू लागल्या

त्याच शब्दांतून
माझ्या कवीता बनू
लागल्या ....
मग बोलण्यास वीषय
आपणहून समोर येवू लागले

कधी महाराष्ट्राची अस्मीता तर
कधी माझी कवीता ,
कधी माझ्या अपेक्षा तर
कधी त्यावर
तीच्या शुभेच्छा

मन अगदी भारावून गेल
होत , आणी आज
पुन्हा बोलायचं ठरलं
होत......

असं वाटत आज तीनेे
सांगावं
या वेड्या जीवाला की,
जे आहे तुझ्या मनात ते
आलाय रे

माझ्या ध्यानात,
म्हणूनच ..
प्रेमाच्या या अथांग
सागरात चल आपण न्हावू
या ,

आणी गहीवर्लेल्या या भावनांना मोकळीक
आज देवू या .......
अशाच एका संध्याकाळी
फ़ुलपाखरु ते मज-जवळ आले
येऊन सुदर, स्वछंदी, ऊनाड
कानी माझ्या दु:ख सागुन गेले...

ओळख नाही त्याची नि माझी
पहिल्याच भेटीत इतक्या जवळ आले
मीही मित्र म्हणून दु:ख तुझे आहे ते माझे
सागुनी प्रेमळ स्वप्णी त्यास वचन दिले...

दिवस रात्र झटलो
दु:ख त्याचे दुर करण्यामागे लागलो
माहित होती व्यथा त्याची मला
स्वत:ला विसरुन त्याजवळ जाऊ लागलो...

हसत रहवे त्याने सतत
म्हणून स्वत: रडत राहिलो
कळत-नकळत मन माझे त्यासी जुडले
स्वछंदी मन माझे मला सोडुनी गेले...

दिवस तो मग असाच एक
न सागताच आला
फ़ुलपाखरु ते उडुन दूर गेले
आहाकार मनी माजला...

फ़ुलपाखरुच ते, नाही बंधनात कुणाच्या
उगाच मन हे भ्रमात होते
कधी न कुणाचे झाले ते
मन माझे त्याच्या साथ होते...

कधी न ह्रुदयाच्या "बीट" त्या
आज त्यासाठी पडू लागल्या
लळा लाऊनी ते इतके गेले
आठवणी स्वप्णी येऊ लागल्या...

नेहमीच ते माझे-माझे
म्हणत राहिलो
पण त्याचा कधी
मी झालोच नाही....

Thursday, July 5, 2012


तिने कित्ती सुंदर दिसावं..
जसं गुलाबाचं फूल उमलावं..
कोणाच्याही नजरेत भरावं..
तासन तास पाहत रहावं..!!!!
तिने कित्ती गोड बोलावं..
ऐकणाऱ्याने विरघळून जावं..
हरवूनच जावं ..
सोबत तिच्या..!!!!
तिने कित्ती साधं रहावं ..
त्यातही रूप तिचं खुलावं..
कोणीही फिदा व्हाव ..
अदांवर तिच्या..!!!!
तिचं उदास होणं..
कसं हृदयाला भिडावं..
कोणालाही वाईट वाटावं..
अश्रूंनी तिच्या..!!!!
तिचं हसणं ..
कोणालाही सुखवावं..
कोणीही घसरून पडावं..
गालावरल्या खळीत तिच्या..!!!!
तिच्या नजरेने मलाच शोधावं..
अचानक नजरेने नजरेला भिडावं ..
मग तिने लगेच दुसरीकडे पहावं..
लाजेने चूर चूर व्हावं..!!!!
ती समोर असताना ...
मी सारं काही विसरावं..
तिने इश्य करत लाजावं..
मी 'आये हाये' करत घायाळ व्हावं ..!!!!
तिने फक्त माझंच रहावं..
मीही फक्त तिच्यासाठीच जगावं..
साथ देऊ जन्मोजन्मी ..
विरहाचं दुख कधीही न यावं..
कधीही न अनुभवावं..!!!!

Friday, June 29, 2012

हर एक क्षणाला नाही पण ....
....कोणी तरी तुझा विचार करतं

दिसुन येत नाही कधी पण ...
...कोणी तरी तुझी काळजी करतं

जाणवत नसेल कधी तुला पण...
...कोणी तरी तु नसल्याची खंत करतं

उगाचं नाही श्यक्य होत कधी पण ...
... कोणी तरी तुझ्याशी बोलायची संधी शोधतं

कळतही नाही कधी तुला ...
... कोनाला तरी तुझा अभिमान वाटतो ...

बोलून नसेल सांगत कधी पण ...
... कोणी तरी तुझ्या बद्दल नेहमी शुभ चिंततं...

तुला नसेल कुणावर कधी पण ...
... कोणी तरी तुझ्यावर फार विश्वास करतं ..

ऐकले नसतील सुर कधी तु पण ...
... कोणी तरी तुझ्यासाठी आनंदाचं गाणं गातं

समजूही देत नाही तुला कधी पण ...
... कोणी तरी तुझ्यावर झेपावणारी सारी संकटे स्वतःवर झेलतं

बोलायचं म्हणून नाही पण ...
... " तुझ्यासाठी मी नेहमी इथेचं आहे " सांगावसं वाटतं

सामोरेचं रहा सदा असे नाही पण ...
... कुनाला तरी तुला एकवार मन भरुन पहावसं वाटतं

तुला कोण आवडावं तु ठरवावं पण ..
... तु तु आहे म्हणून कुणाला तरी आवडतं...

तु नेहमी सुखात असावं ...
... आणि तुला कुणी तरी नेहमी आनंदी पाहून आनंदी व्हावं ...

कुणी तरी तुझ्यासाठी कुणीचं नसावं पण...
... कुणा तरी साठी तु बरंचं काही असावं ...

Wednesday, June 27, 2012


तुझे वेड लाउनी गेले ते क्षण
मनाला भुलवून गेले ते क्षण ,
स्वतःला फसवून , जगाला चुकवून
नकळत कुठे पळून गेले ते क्षण .....
चमकत्या गहिऱ्या डोळ्यांत गहिवरून गेलो मी
निस्वार्थ प्रेमजाळ्यात पूर्णत: अडकून गेलो मी ,
अंतरंगास हळुवार स्पर्शून गेले ते क्षण
तुझे वेड लाउनी गेले ते क्षण .....
अवखळ पाऊस अंग अंग भिजवत होता
खट्याळ वारा मनात प्रेमरंग उधळीत होता ,
हव्याहव्याशा सहवासात जागीच स्तब्ध झाले ते क्षण
तुझे वेड लाउनी गेले ते क्षण ....
तू आली सळसळणार्या वाऱ्यासारखी आयुष्यात
तू बहरली आंब्याच्या मोहरासारखी आयुष्यात ,
हृदयाच्या वेलीवर सहस्त्र पुष्प फुलवून गेले ते क्षण
तुझे वेड लाउनी गेले ते क्षण ....
अचानक उमटली तुझी पाऊले एकदा दारी
कानाकोपऱ्यात नांदली जशी लक्ष्मी माझ्या घरी ,
पाऊलखुणा हृदयात साठवून गेले ते क्षण
तुझे वेड लाउनी गेले ते क्षण .....
तुझे वेड लाउनी गेले ते क्षण
जीवनवाट तुझसंगे चालुनी गेले ते क्षण ,
तुझी साथ देईन , फक्त तुझाच बनून राहीन
जन्मभर हे वचन निभवून गेले ते क्षण .....

मृगेश

Sunday, June 24, 2012


Mrugesh PisalBlogger Widgets

Thursday, June 21, 2012


माझ्यापेक्षा तुझ्यात रमून जानेमला पसंद आहे
तुझ्या डोळ्यात रमून जाण्यात एक वेगळाच आनंद आहे.
तुला हसवण्यापेक्षा तुला रडवणे मला पसंद आहे
मिट्टीत घेवून तुला समजावण्यात एक वेगळाच आनंद आहे.
तुझ्या होकाराला नकार देणे मला पसंद आहे
तुला रागवलेली पाहण्यात एक वेगळाच आनंद आहे.
माझ्यापेक्षा तुला सुखी ठेवणे मला पसंद आहे
तुझ्या सुखात आपले सुख समजण्यात एक वेगळाच आनंद आहे.
तुझ्यापेक्षा माझ्या डोळ्यातून अश्रू वाहणेमला पसंद आहे
वाहणारे अश्रू थांबवण्यात एक वेगळाच आनंद आहे....


आता फुलांनी थोडं
जपायाला हव,
चोरटया नजरांपासून
लपायला हव...
.
पाकळ्यानींही स्वत:ला
सावरायला हव,
उगाचच दूरवर पसरण
आवरायला हव...
.
इथे छंद म्हणुन
फुलं हुंगणारे बरेच,
अन धुंदवेडे होवून
फुलं चुंबणारेही तेवढेच...
.
कुणी सांगाव हे फुलांना
त्यांनीच सारे समजायला हव,
कुणाच्या कुशीत शिराव अलगद
हे फुलांनीच ठरवायला हव ....
त्यांच त्यांनीच ठरवायला हव........
.

बोल बाबा  बोल,
काहीतरी बोल,
माझ्यासाठी तरी,
आज ओठ तुझे खोल ,

बोलून बोलून थकले रे ,
आता माझे तोंड,
का रे अचानक आज
मांडले तू बंड,

लावू नको माझा,
उगा जीव टांगणीला,
क्षमा कर न रे राजा,
तुझ्या या राणीला,

कळत कस नाही तुला,
खोट खोट रुसणं,
बर का हे अस ,
वेळोवेळी हिरमुसणं,

छळू नको माझ्या राजा,
पकडले मी कान,
माफ केल म्हणून नुसती,
हलव तरी मान.

आता मात्र हद्द झाली,
हास पाहू आधी,
निघून जाईन नाहीतर मी,
बोलणार नाही कधी,

आता कशी स्वारी ,
छान वळणावर आली,
उशिरा का होईना,
पण दया तुला आली,

तुझ्याशिवाय दुसर कोणी,
आहे का रे मला,
चुकले तरी तूच आता
सांभाळून घे मला,

उशीर झाला निघते आता,
कशी थांबू या अवेळी,
रागवू नकोस पुन्हा ,
उद्या भेटू या सकाळी...........

Tuesday, June 19, 2012

तुझ्या माझ्या प्रेमाचं प्रिये,
गणित थोडं वेगळ असावं..
गंध होऊन वाऱ्याचा,
तू श्वासांत माझ्या मिसळावं
अन् सहवासात तुझ्या प्रिये,
मि श्वास घ्यायलाच विसरावं..
तुझ्या माझ्या प्रेमाचं प्रिये,
गणित थोडं वेगळ असावं..
पाहताना डोळ्यात तुझ्या,
मि मलाच शोधावं
अन् बोलायचं असलं खूप तरी,
डोळ्यांनीच
मि तुझ्याशी बोलावं..
तुझ्या माझ्या प्रेमाचं प्रिये,
गणित थोडं वेगळ असावं..
भरभरून करतांना प्रेम,
कधी माझ्यावर तू रुसाव
अन् मि घेतल्यावर मिठीत,
खूप गोड तू हसावं..
तुझ्या माझ्या प्रेमाचं प्रिये,
गणित थोडं वेगळ असावं..
मिठीत तुझ्या असतांना,
वेळेनही थोडं थांबावं..
अन् शक्य नसल या आयुष्यात तरी,
जन्मात पुढच्या हेच घडाव..
तुझ्या माझ्या प्रेमाचं प्रिये,
गणितच थोडं वेगळ असावं.
एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याला आपल्या मनातले सर्व काही सांगावे,
सांगता सांगता आयुष्य पूर्ण सरुन जावे,
आणि सर्तानाही आयुष्य पुन्हा पुन्हा जगावे........

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याला घेऊन सोबतीने खूप खूप चालावे,
चालता चालता दूरवर खूप खूप थकावे,
पण थकल्यावरही आधारसाठी त्याच्याकडेच पहावे........

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
दुख त्याचे आणि अश्रू माझे असावेत,
सोबतीने त्याच्या खूप खूप रडावे,
आणि अश्रूंच्या हुंदक्यात सर्व दुख विरून जावे.........

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
आनंद त्याचा आणि हसू माझे असावे,
त्याच्यासाठी मी जगतच राहावे, जगतच राहावे,
आणि त्याच्यासाठी जगतानाच आयुष्य संपून जावे.......

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याच्या सोबतितल्या प्रत्येक क्षणाने सुखवावे,
उन्हात त्याने सावली तर पावसात थेंब व्हावे,
आणि मायेच्या थेंबानी मी चिंब भिजून जावे...........

आयुष्यातली एकच इच्छा......
राजा-राणीच्या संसारातील राजाच ते
पण माझ्यासाठी फक्त माझे बाबाच आहे ते

छोटुशी बाहुली पाहून झाले होते खूप आनंदी
मलाच सर्वस्व मानून उडू लागले होते स्वच्छंदी

बाबा बाबा म्हणत माग फीरण काम होत माझ
माझे लाड पुरवणे हेच स्वप्न होत त्याचं

हातांचा झुला करून झुलवले आहे त्यांनी मला
माझ्यासाठी एक खेळणे बनवले होते स्वतःला

त्यांची ती मऊ मांडी गादिहून छान मला भासली
माझ्यासाठी तर ती हक्काची जागाच होती बनली

नव्हते लादले कधी त्यांनी ते आपेक्ष्यांचे ओझे
तेच नेहमी माझ्यासाठी होते खूप मोठे

माझ्यासाठी रात्रंदिवस ते झिजले आहेत नेहमी
स्वतःचे सुख ठेऊन पहिले मला पाहीले आहे त्यांनी

दमून भागून आले तरी जवळ घ्यायचे ते मला
आईच्या रागापासून वाचवण हेच काम होत त्यांना

माझ्याशिवाय कधी जेवले नाही ते
मला झोपवूनच मग झोपले नेहमी ते

एकाच नेहमी चिंता जाणवत आसते त्यांना
सासुराला मी गेल्यावर आठवतील का ते मला

कस सांगू आता मी त्यांना............

मातीच्या ह्या गोळ्याला आकार तुम्ही दिला
तुम्हाला विसरणं आता अशक्यच आहे मला

बाबा तुम्ही हे करा बाबा तुम्ही ते करा आसते मी नेहमी म्हणत
मी गेल्यावर तुम्ही एकटे पडू नये हेच आसत त्या मागच कारण

काळजी नका करू तुम्ही ,तुमची बछडी आहे खूप हुशार
जीवनातील आव्हानांना तोंड देण्या घेणार नाही मी माघार

Monday, June 18, 2012

ऑफीस मधे बसल्या बसल्या विचार करत होतो,
हे दिवस चांगले की कॉलेजचे ...

जुगलबंदी चालू होती दोघांची..
आता वेळ कमी तेव्हा पैसे कमी..
आनंदी आता आहे का तेव्हा होतो ?
आठवता आठवता दुखी होतो....

तेव्हा रोड साइड जीन्स वापरायचो...मित्रांच्या
आता CK, Diesel धूळ खात पडल्या आहेत माझ्या...

तेव्हा सामोसा दिसला की भूक शमायची....
आता पिझ्झा बर्गरने सुद्धा ती नाही लागायची..

ऑफीस मधे बसल्या बसल्या विचार करत होतो,....
हे दिवस चांगले की कॉलेजचे ...

तेव्हा पैसे जमवून पेट्रोल भरायचो..
लांब लांब फिरायला जायचो...
आता tank फुल्ल असूनही...
मित्रांना मुकलो....

टपरी वरचा चहा CCD मधल्या cofee मधे बदलला,
पण हा फरक मनाला नाही पटला..

Pre-Paid Card वरुन बोलायची तेव्हा मजा यायची...
आता postpaid असूनही बोलायला नाही कुणी..

ऑफीस मधे बसल्या बसल्या विचार करत होतो,....
हे दिवस चांगले की कॉलेजचे ...

दिवस बदलले ... General class मधून Business Class झाला.
पण फिरायला आता वेळ नाही उरला...

तेव्हा Second hand का होईना Desktop असावा असे .वाटत..
आजकाल Branded Laptop असूनही चालू करावा नाही वाटत...

खरी मैत्री Proffesional frenz मधे बदलली
पण त्या...मैत्रीची सर नाही आली....

ऑफीस मधे बसल्या बसल्या विचार करत होतो,....
हे दिवस चांगले की कॉलेजचे ...

Sunday, June 17, 2012

प्रेमाला प्रेम समजणारी ती प्रेयसी असावी
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी असावी.....बागेतल्या फुलांसारखी सुंदर नसली तरी,
पण अंगणातल्या तुळसेसारखी पवित्र असावी...थोडी खट्टी...थोडी मिठी असावी
तिच्या लटक्या रुसण्या फुगण्यात मज्जा असावी....प्रेमाला प्रेम समजणारी ती प्रेयसी असावी
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी असावी

तेल आणि वात यांसारखी आमची जोडी असावी,......
एकरूप होऊन जळताना इतरांना प्रकाश देणारी असावी

Tuesday, June 5, 2012

तुझ्या मैत्रीवर कितीही लिहीलं
तरी उनं वाटतं
सारं आहे माझ्याकडे आज
तरी कुठंतरी काहीतरी सुनं वाटतं

तुझ्या मैत्रीचे क्षण
पुन्हा हवेहवेसे वाटु लागतात
आज मन माझं लख्ख आकाश
त्यात तुझ्या आठवांचे ढग दाटु लागतात

तुझ्या मैत्रीची गर्द सावली
अशी आयुष्यावर दाटली होती
आयुष्यातली उन्हं माझ्या
तुझ्याचमुळे आटली होती

तुझ्या मैत्रीच्या आठवणी
मी आजही जपुन ठेवतो
आनंदाचे ते क्षण हरवु नयेत म्हणुन
काळजाच्या तिजोरीत लपुन ठेवतो

मैत्रीचं नातं तुझ्या
माझ्याशी आजन्म असचं राहील
तुला ठेच लागली कधी
तर पापणी माझी वाहील

मन माझे वेडे
पुन्हा एकदा त्या क्षणांचा शोध घेतात
अन शब्द माझे कवितेतुन
तुझ्या मैत्रीचा वेध घेतात ....

स्वप्नांच्या जगात माझ्या एक फुलांची बाग होती
बागेतल्या त्या कट्ट्यावर फक्त तुझीच मला साथ होती
हातात घेवून तुझा हाथ तिथे कविता मी करत होतो
तुझ्याच प्रेमात ग सजणी वेड्यासारखा मी झुरत होतो
तू स्वप्नातही मला अचानकच सोडून जायचीस
वेड्या ह्या जीवाला माझ्या, एकाकी सोडायचीस
घाबरलेल मन माझ तुला शोधत फिरायचं
थकून भागून बिचार मग एकटच रडायचं
स्वप्नातही कधी तू माझी न झालीस
एकट्याला टाकून मला दूरदेशी गेलीस
दूरदेशीच्या राजकुमारात तू अस काय ग बघितलंस
तुझ्याच ह्या प्रतिबिंबाला अस का ग रडवलस???
आजही तुझ्या पाऊलखुणा त्या वाटेवर शाबूत आहेत
परतीची वाट कधीच नसते रडून मला सांगत आहेत

Monday, June 4, 2012

दोस्त बनाना सिखा दिया है जिंदगी ने
खुश रेहना सिखा दिया है जिंदगी ने

दूर रेहकर भी पास होते हो तुम
तुमसे बात करना सिखा दिया है जिंदगी ने

रोंना नही आता है मुझे शायद
हंसणा सिखा दिया है जिंदगी ने

फूलो मे खुशबू ही न सही
पर खुशबू को मेहसुस  करना  सिखा दिया है जिंदगी ने


 
थकलेले जीव सारे
सावलीला निजले होते
बाभळीचे झाड घराशी
फुलांनी सजले होते
पाखरांनी आपले घरटे
छपराला टांगले होते
भातुकलीचे डाव दारी
खेळ सारे मांडले होते

तेव्हा उमगले ते घर
माझ्या मित्रांने बाधले होते.

Friday, June 1, 2012

नसतेस घरी तू जेव्हा
जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे
संसार फाटका होतो

नभ फाटून वीज पडावी
कल्लोळ तसा ओढवतो
ही धरा दिशाहीन होते
अन्‌ चंद्र पोरका होतो

येतात उन्हे दाराशी
हिरमुसून जाती मागे
खिडकीशी थबकुन वारा
तव गंधावाचून जातो

तव मिठीत विरघळणाऱ्या
मज स्मरती लाघववेळा
श्वासाविण ह्रुदय अडावे
मी तसाच अकंतिक होतो

तू सांग सखे मज काय
मी सांगू या घरदारा ?
समईचा जीव उदास
माझ्यासह मिणमिण मिटतो

ना अजून झालो मोठा
ना स्वतंत्र अजुनी झालो
तुजवाचून उमगत जाते
तुजवाचून जन्मच अडतो !

गीत - संदीप खरे
नाते दोन जिवांचे !
नाते दोन जीवांचे, तुझे नि माझे
दूर- लांब राहूनही अतूट राहते कसे? ।।धृ।।
कधी आनंदाने गळ्यात सुचतात गाणी
कधी तुझी आठवण, डोळ्यांत आणते पाणी
गाण्यातील सूर मग असे फुटतात कसे?
नाते दोन जीवांचे, तुझे नि माझे
दूर-लांब राहूनही अतूट राहते कसे? ।।1।।
कधी स्वप्नात येऊन, बेचैन करून जातेस
कधी योगाने भेटल्यावर वायदा देऊनफसवतेस
भेटीतील ओढ मग वाढतच कशी जाते?
नाते दोन जीवांचे, तुझे नि माझे
दूर - लांब राहूनही अतूट राहते कसे? ।।2।।
कधी हसतेस, कधी रुसतेस, तर कधी रागावतेस
कधी गुपचुप रडतेस, तर कधी मलाही रडवतेस
नयनांतून आसू मग वाहतात कसे?
नाते दोन जीवांचे, तुझे नि माझे
दूर-लांब राहूनही अतूट राहते कसे? ।।3।।
नाते आपले अतूट - अखंड राहू दे
आपल्यातील प्रेम असेच उदंड वाढू दे
दूध-साखरेसारखे आपले नाते मग घट्ट बनेल असे
नाते दोन जीवांचे, तुझे नि माझे
दूर-लांब राहूनही अतूट राहते कसे... ।।4।।
चिमणा चिमणीचे लगीन,
तिथे वऱ्हाडी कोण कोण ?
चिमणा चिमणीचे लगीन,
तिथे वऱ्हाडी कोण कोण ?

मैना म्हणे मी माळीन,
मैना म्हणे मी माळीन
टोपली भर फुले मी आणीन
टोपली भर फुले मी आणीन. !

चिमणा चिमणीचे लगीन,
तिथे वऱ्हाडी कोण कोण ?

पोपट म्हणे मी भट,
पोपट म्हणे मी भट.
मंत्र म्हणेन मी पाठ
मंत्र म्हणेन मी पाठ.

चिमणा चिमणीचे लगीन,
तिथे वऱ्हाडी कोण कोण ?

कावळा म्हणे मी सोंगाड्या,
कावळा म्हणे मी सोंगाड्या,
लग्नात वाजवेन भोन्गाड्या
लग्नात वाजवेन भोन्गाड्या.

चिमणा चिमणीचे लगीन,
तिथे वऱ्हाडी कोण कोण ?

कोंबडा म्हणे मी आचारी,
कोंबडा म्हणे मी आचारी
पंगत वाढीन दुपारी
पंगत वाढीन दुपारी.

चिमणा चिमणीचे लगीन,
तिथे वऱ्हाडी कोण कोण ?

मोर म्हणे मी नर्तक
मोर म्हणे मी नर्तक.
थुई थुई करून मी नाचेन.
थुई थुई करून मी नाचेन.

चिमणा चिमणीचे लगीन,
तिथे वऱ्हाडी कोण कोण ?

लग्न झाला थाटात
लग्न झाला थाटात
वऱ्हाडी गेले ऐटीत
वऱ्हाडी गेले ऐटीत

चिमणा चिमणीचे लगीन,
तिथे वऱ्हाडी कोण कोण ?

Thursday, May 31, 2012

वेळ आली तर तुलाही सांगीन,
आयुष्य कस जगायचं असत.
एका-एका शब्दामधून
वाक्य कस बनवायचा असत.
वेळ आली तर तुलाही सांगीन,
... मन कस जिंकायचं असत.
आवडी-निवडी सांगताना कस
मनात मन गुंतवायच असत.
वेळ आली तर तुलाही सांगीन,
स्पर्श कसा करायचा असतो.
वेळ आली तर तुलाही सांगीन,
दुखं कस झिजवायच असत.
अश्रूंचा नवीन संसार करून
सुखाने कस नांदायचं असत.
वेळ आली तर तुलाही सांगीन,
प्रेम कस करायचं असत.
विरहात प्रेमाची आहुती देऊन
क्षितिजाकडे कस बघायचं अस...

Wednesday, May 30, 2012

जीवन मोजकंच असतं,
ते हसत हसत जगायचं असतं,
जुळलेलं नातं कधी तोडायचं नसतं,
आनंद-दु:खाने भरलेलं हे आयुष्य असतं,
कुठं काही हरवतं तर कुठंकाही सापडतं
त्यातूनच हरवलेलं शोधायचं असतं,
सापडलेल नाते प्रेमाने जपायचं असतं,
ते नाते म्हणजे प्रेमळ मैञिचे असतं

Tuesday, May 29, 2012

दिवस कितीही व्यवहारी गेला तरी
रात्री थोडं senti व्हायला होतं
एकांतात मन खोलवर जातं
आणि मागे वळून पाहायला होतं

अश्या चांदण्या रात्रीत
थोडं घुटमळणं होऊन जातं
आकाशाच्या खजिन्यावरती
भाळणं होऊन जातं

अश्या मोहक रात्री
रातराणीचं भूलवणं होतं
कितीही रुसलं फसलं तरी
दुखरं मन झुलवणं होतं

अश्या हलक्या रात्री
माथ्यावारले भार उतरवायला होतं
भरले सारे रांजण ओतायला होतं
मन वाहायला होतं

अश्या मंद प्रहरी
थोडं थांबणं होऊन जातं
जगत तर असतोच
पण थोडं जगणं होऊन जातं...