Monday, May 28, 2012

सुंदर चेहऱ्यावर लगेच भाळायच नसतं ,
गोड हसण्यावर त्वरित फसायचं नसतं ,
 चेहर्यामागील खरं मन जाणायच असतं ,
 हास्याआडील सत्य समजून घ्यायचं असतं !

 प्रेम करणं इतकं सोपं नसतं ,
केलंच तर आयुष्यभर निभवायच असतं!

पैशाच्या श्रीमंतीस केवळ पहायचंनसतं ,
 मधाळ बोलण्यावर केवळ भुलायच नसतं ,
पैश्याने ऐशारामात जरूर राहता येत असतं ,
पण भावनिक मने जुळण्याची खात्री नसतं !

प्रेम करणं इतकं सोपं नसतं , 
केलंच तर आयुष्यभर निभवायच असतं!

 प्रेम म्हणजे प्रेमीस आपलं मानण असतं ,
 प्रेमीस आनंदी ठेवणं हेच ध्येय्य असतं ,
प्रेमीची सुख दु:ख्ख मनातून जाणणं असतं ,
आयुष्यभर विश्वासाने एकमेकांस साथ देणं असतं !
 प्रेम करणं इतकं सोपं नसतं ,
केलंच तर आयुष्यभर निभवायच असतं!

No comments:

Post a Comment