Thursday, May 31, 2012
Wednesday, May 30, 2012
Tuesday, May 29, 2012
दिवस कितीही व्यवहारी गेला तरी
रात्री थोडं senti व्हायला होतं
एकांतात मन खोलवर जातं
आणि मागे वळून पाहायला होतं
अश्या चांदण्या रात्रीत
थोडं घुटमळणं होऊन जातं
आकाशाच्या खजिन्यावरती
भाळणं होऊन जातं
अश्या मोहक रात्री
रातराणीचं भूलवणं होतं
कितीही रुसलं फसलं तरी
दुखरं मन झुलवणं होतं
अश्या हलक्या रात्री
माथ्यावारले भार उतरवायला होतं
भरले सारे रांजण ओतायला होतं
मन वाहायला होतं
अश्या मंद प्रहरी
थोडं थांबणं होऊन जातं
जगत तर असतोच
पण थोडं जगणं होऊन जातं...
तप्त उन्हात मिळालेली सावली म्हणजे तू,
तहानलेल्या ओठांना मिळालेला पाण्याचा एक थेंब म्हणजे तू ,
जगण्यासाठी मिळालेला एक श्वास म्हणजे तू ,
दृष्टी नसलेल्या डोळ्यांना मिळालेला आशेचा किरण म्हणजे तू ,
अजून कसे सांगू माझ्यासाठी कोण आहेस तू,
वाट चुकली कि सरळ मार्गाने नेणारा तू ,
माझ्या पायात काटा रुतला तरी स्वताचे लपवून अश्रू पुसणारा तू ,
पावसात भिजताना छत्री नसताना डोक्यावर हाथ ठेवणारा तू ,
माझ्या चेहऱ्यावर हसू पाहण्यासाठी अगदी विदुषक झालेला तू ,
अजून कसे सांगू कि माझ्यासाठी कोण आहेस तू ,
माझा अर्धवट शब्द पूर्ण करणारा तू,
मी काहीच न बोलता समजून जाणारा तू ,
माझ्यासाठीच जगणारा तू , माझ्याशिवाय काहीच न समजणारा तू ,
माझे सर्वस्व आहेस तू ......फक्त तू
अजून कसे सांगू माझ्यासाठी कोण आहेस
तू.......फक्त तू...
Monday, May 28, 2012
मी नाही म्हणत....
तू फक्त माझं असावं... पण माझ्या जीवनात मात्र तुझ्याखेरीज कुणी नसावं...
मी नाही म्हणत....
तू मलाच आठवावं..पण तू मात्र सदैव माझ्या स्मरणात राहावं..
मी नाही म्हणत....
तू मला मनात ठेवावं... पण माझ्या मनी मात्र तूच वसावं...
मी नाही म्हणत....
तू माझ्यासाठी रडावं....पण माझी पापणी मात्र तुझ्याचसाठी भिजावं..
मी नाही म्हणत....
तू मला प्रेम कराव... पण कधीतरी तुलाही माझ्याचसारखा प्रेम व्हाव...
मी नाही म्हणत....
तू कधी हसू नये.... पण माझ्यासाठी हसण्याचे कारण मात्र तूच असावं..
मी नाही म्हणत....
तू मला भेटावं..पण माझ्यासाठी ती भेट मला सुखी करून जावं...
मी नाही म्हणत....
कधी तू माझ्यासाठी कविता रचावी... पण माझी लेखणी तुझ्याच आठवणीत वळावी....
मी नाही म्हणत....
कधी तुला मीच दिसावं.... पण मला, डोळे बंद होताच स्मरणात तुझाच चित्र रेखातावं...
मी नाही म्हणत....
कधी तुझी भावना तुझ्यापासन दूर जावी.. पण दुख होईल मला, जर माझी भावना तुला न कळली....
मी नाही म्हणत....
तुझ जगन माझ्यासाठी बदलावं... पण माझं स्वप्न जगणं हे तुझ्याकुशीत
पूर्ण व्हाव...
मी नाही म्हणत....
माझ्या भावनानसोबत खेळू नको... पण माझं तुझ्यावर खरच प्रेम आहे हे तू
विसरू नकोस...
मी एवढच म्हणते....
माझ्या प्रेमाची जाणीव व्हावी.... अन पुढच्या जन्मीतरी तु माझा अन
मी तुझी बनून याव...
सुंदर चेहऱ्यावर लगेच भाळायच नसतं ,
गोड हसण्यावर त्वरित फसायचं नसतं ,
चेहर्यामागील खरं मन जाणायच असतं ,
हास्याआडील सत्य समजून घ्यायचं असतं !
प्रेम करणं इतकं सोपं नसतं ,
केलंच तर आयुष्यभर निभवायच असतं!
पैशाच्या श्रीमंतीस केवळ पहायचंनसतं ,
मधाळ बोलण्यावर केवळ भुलायच नसतं ,
पैश्याने ऐशारामात जरूर राहता येत असतं ,
पण भावनिक मने जुळण्याची खात्री नसतं !
प्रेम करणं इतकं सोपं नसतं ,
केलंच तर आयुष्यभर निभवायच असतं!
प्रेम म्हणजे प्रेमीस आपलं मानण असतं ,
प्रेमीस आनंदी ठेवणं हेच ध्येय्य असतं ,
प्रेमीची सुख दु:ख्ख मनातून जाणणं असतं ,
आयुष्यभर विश्वासाने एकमेकांस साथ देणं असतं !
प्रेम करणं इतकं सोपं नसतं ,
केलंच तर आयुष्यभर निभवायच असतं!
गोड हसण्यावर त्वरित फसायचं नसतं ,
चेहर्यामागील खरं मन जाणायच असतं ,
हास्याआडील सत्य समजून घ्यायचं असतं !
प्रेम करणं इतकं सोपं नसतं ,
केलंच तर आयुष्यभर निभवायच असतं!
पैशाच्या श्रीमंतीस केवळ पहायचंनसतं ,
मधाळ बोलण्यावर केवळ भुलायच नसतं ,
पैश्याने ऐशारामात जरूर राहता येत असतं ,
पण भावनिक मने जुळण्याची खात्री नसतं !
प्रेम करणं इतकं सोपं नसतं ,
केलंच तर आयुष्यभर निभवायच असतं!
प्रेम म्हणजे प्रेमीस आपलं मानण असतं ,
प्रेमीस आनंदी ठेवणं हेच ध्येय्य असतं ,
प्रेमीची सुख दु:ख्ख मनातून जाणणं असतं ,
आयुष्यभर विश्वासाने एकमेकांस साथ देणं असतं !
प्रेम करणं इतकं सोपं नसतं ,
केलंच तर आयुष्यभर निभवायच असतं!
Subscribe to:
Posts (Atom)